अबब... 50 लाखांची म्हैस, देते एवढं लिटर दूध

जाणून घ्या काय आहे 'या' म्हशीची खासियत     

Updated: Feb 5, 2021, 07:16 PM IST
अबब... 50 लाखांची म्हैस, देते एवढं लिटर दूध title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : आपण आजपर्यंत अनेक म्हशी पाहिल्या, एखाद्या म्हशीची किंमत किती असू शकते... एक लाख.... दोन लाख.... पाच लाख.... पण हरियाणातल्या एका म्हशीची किंमत तब्बल 50 लाख रूपये आहे. 50 लाख रूपयांची ही मु-हा म्हैस अत्यंत खास आहे. मुऱ्हा घरी असली की लक्ष्मी प्रसन्न झालीच म्हणून समजा. कारण ही म्हैस भरपूर दूध देते. या जातीच्या म्हशी इतर जातींच्या म्हशींपेक्षा जवळपास दुप्पट दूध देतात. 

मुऱ्हा जातीची म्हैस 15 ते 20 लीटर दूध देते. काही मुऱ्हा म्हशी तर 30 ते 35 लीटर दूध देतात. या म्हशीच्या दुधाला 7 किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागतं. पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातले शेतकरी मु-हा म्हशी पाळतात.

मुऱ्हा जातीची म्हशीची इम्युनिटी एकदम भारी असते. कुठल्याही वातावरणात त्या ठणठणीत राहतात. या मुऱ्हा म्हशीची किमंत 1 लाखांपासून ५ लाखांपर्यंत असते. काही म्हशींना तर तब्बल ५० लाख मिळतात. आता ऑनलाईनही या म्हशी विकल्या जातात. अशा या ठणठणीत म्हशी, दूधही जास्त आणि फॅटही जास्त असल्यामुळेच मुऱ्हा जातीच्या म्हशींना काळं सोनं म्हणतात.