500 पर्यटक सांदण दरीत अडकले; काजवा महोत्सवाला गेलेल्यांना दिवसा काजवे दिसले

निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’  पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्सना आक्रषित करत असते. 

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2023, 10:54 PM IST
500 पर्यटक सांदण दरीत अडकले; काजवा महोत्सवाला गेलेल्यांना दिवसा काजवे दिसले title=

Ahmednagar Sandhan Valley : काजवा महोत्सवाला गेलेल्यांना दिवसा काजवे दिसले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’त 500 पर्यटक अडकले होते (Sandhan Valley). वेळीच मदत पोहचल्याने दरीत अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हे पर्यटक अडकले होते. 

भंडारदरा परिसरातील सांदण दरी जगप्रसिद्ध आहे. येथे अडकलेल्यांची पर्यटकांची सुटका करण्यात आली. पाऊस आणि वादळी वारे यामुळं तब्बल 500 हून अधिक पर्यटक सांदण दरीत अडकले होते. रविवारची सुट्टी असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

काजवा महोत्सवासाठी आले होते पर्यटक

शनिवार , रविवार सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेला काजवा महोत्सवचा आनंद घेण्यासाठी  पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. भंडारदरा परिसरला जत्रेचे स्वरुप निर्माण झाले आहे.  जिकडेतिकडे पर्यटकांच्या वाहनांची रांगच रांग लागलेली पाहायला मिळत आहे. यातील काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा अनुभव गेताल. यानंतर रविवारी दुपारी आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदन दरीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक दरीमध्ये उतरले होते. अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पाण्याचा ओघ वाढु लागला. त्याच दरम्यान तेथे गस्तीवर असलेले वनविभागाचे वनसंरक्षक महिंद्रा पाटील  दिवे यांना माहिती मिळाली की सुमारे 500 ते 600 पर्यटक सांदन दरी अडकले आहेत. त्यांनी तात्काळ मदत कार्यासाठी धाव घेत स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.

भिमाशंकर जवळील जंगलात  हेलिकॉप्टरचे तातडीचे लँडिंग

भिमाशंकर जवळील म्हताबाचीवाडी येथील जंगलात  हेलिकॉप्टरचे तातडीचे लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे हे लँडिंग केलं गेले. या हेलिकॉप्टरमध्ये उद्योगपती राजीव गांधीं सह चार जण प्रवास करत होते. सर्वजण सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पर्यटकांना आकर्षित करते सांदण व्हॅली

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारात ही दरी आहे.  पर्यटक मोठ्या संख्येन येथे ट्रॅकिंगसाठी येत असतात.