महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी

 महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.

Updated: May 28, 2020, 06:53 AM IST
महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांची गैरसोय होऊ लागली होती. त्यातच परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी परतीची वाट धरली होती. अनेक जण पायी रस्त्यान चालू लागले होते. त्यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले.महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  २७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले. 

रप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यासाठी ६९६ विशेष श्रमिक रेल्वे महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्या. यातून आतापर्यंत  ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परतले आहेत, अशी माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्य प्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकामधून या रेल्वे सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून १११, लोकमान्य टिळक टर्मिनस ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपूर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.