9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान

पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे. 

Updated: Jul 3, 2023, 12:36 AM IST
9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान title=

Jayant Patil on Ajit Pawar :  राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो.  शपथविधीनंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीपधावर दावा केला आहे. 9 आमदार म्हणजे पक्ष नाही नाही असं म्हणत अजित पवार यांच्या बंडाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधन केले आहे. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात येत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी पक्षाला धोका दिला

राष्ट्रवादी पक्षाला धोका देऊन नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुक आयोगाला आम्ही याबाबत कल्पना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसबोत. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. नऊ आमदार  म्हणजे पक्ष होत नाही असं म्हणत राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान केले आहे.  अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार परत येण्यास इच्छुक आहेत. यामुळे फक्त नऊ आमदारांवर कारवाई होणार असून इतर आमदार परत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.  ते परत आल्यास त्यांचे स्वागत आहे असेही जयंत पाटील म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करण्याचा पवारांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिलाय. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार, असं पवारांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी म्हणून यापुढं आक्रमकपणे काम करणार, असंही पवारांनी सांगितले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्या यांच्यामधला शाब्दिक संघर्ष देखील आज उभ्या महाराष्ट्रानं पाहिला.  राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सामील होतोय. यापुढील निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढू, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. तर चिन्हानं काही होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयाबाबत वरिष्ठांना सांगितलं होतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. तर त्यांना दुसरा कुणी वरिष्ठ असू शकेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.