मराठा आरक्षणाच्या वादात मोठा ट्विस्ट; अजित पवार यांचे मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज

मराठा आरक्षणावरुन कायदा हातात घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा अजित पवार यांनी जरांगेंना दिला आहे. तर, अजित पवारांच्या पोटातलं ओठावर आलं असा पलटवार जरांगे यांनी केला. 

Updated: Jan 7, 2024, 06:10 PM IST
मराठा आरक्षणाच्या वादात मोठा ट्विस्ट; अजित पवार यांचे मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज title=

Ajit Pawar On Manoj Jarange : मराठा आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोकल मनोज जरांगे यांच्यात वाद सुरु आहे. आता या वादात अजित पवार यांची देखील भर पडली आहे. मुंबईत येण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांना अजित पवार यांनी जाहीर इशारा दिला आहे. कायदा हातात घेतला तर कारवाई करु असेही अजित पवार म्हणाले आहेत. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत मोर्चा काढणार आहे.  20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मुंबईत येणाऱ्या मराठा समाजाला अजित पवार यांनी समजुतीचा इशारा दिला आहे.  

जरांगे यांना अजित पवार यांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, काहीजण टोकाचं बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिला आहे. त्यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचं जरांगेंनी म्हटल आहे

नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांची छगन भुजबळ यांच्यावर टीका

आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओबीसी समाजाने ओळखले पाहिजे...ओबीसींच्या कोणत्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही. अशा शब्दात नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय...तर सरड्यासारखे रंग बदलणा-यांपासून सावध राहा असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिलाय...नांदेडमध्ये ओबीसी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हजर आहेत. त्यावेळी त्यांनी भुजबळांवर टीका केलीय...मात्र, या सभेला छगन भुजबळ गैरहजर राहिलेत.

मराठा आरक्षणाचा लढा ताकदीने लढणार - चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोर्टात लढा सुरु असून आरक्षणाचा लढा ताकदीने लढणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून यापुडे एकट्याने शेती करणे न परवडणारे आहे. त्यामुळे सामूहिक शेती करणा-या गटांना कर्जवितरण केलं जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.  राज्य सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासाच्या मार्फत मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. याचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आला.

स्वतःचा छोटा उद्योग उभा करू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील तरुण तसंच प्रयोगशील शेतकरी यांच्यासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गात राज्य सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे.  दरम्यान मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि त्यामुळेच मराठा तरूणांमधला असंतोष दूर करण्यासाठी शिष्यवृत्ती, वस्तीगृह यांचे मुलभूत प्रश्न सोडवण्याचा सरकार प्रयत्न करतेय अशी भूमिका यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडली.