आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला निघाला आणि शेवट झाला; आधारस्तंभ समृद्धीच्या अपघातात गमावला

 बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.घटनास्थळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली.चालक दानिश शेखवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Updated: Jul 1, 2023, 09:09 PM IST
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुण्याला निघाला आणि शेवट झाला; आधारस्तंभ समृद्धीच्या अपघातात गमावला title=

Samruddhi Expressway bus accident:  उज्वल भविष्यासाठी चांगली नोकरी मिळेल या आशेत त्याने पुण्याकडे धाव घेतली. मात्र, तो त्याचा अखेरचा प्रवास ठरला. समृद्धीवर सिंदखेडराजा येथील अपघातातग्रस्त बसने पेट घेतल्यानंतर त्याच्या ज्वाळमध्ये वृद्ध आई वडिलांनी आपला आधारस्तंभच गमवला आहे. नागपुरातील बेसा येथील अभय नगर येथील निवासी असलेल्या कौस्तुभ काळे याचा सिंदखेडराजा येथील बस अपघातात मृत्यू झाला आहे. कौस्तुभच्या अपघाती मृत्यूने 74 वर्षीय वडील आणि 70 वर्षीय आई यांच्या जीवनात आयुष्यभरकरता भयाण शांतता निर्माण झाली आहे.

नोकरीच्या मुलाखतीसाठी पुण्याला निघाला होता

कौस्तुभची आई निवृत्त शिक्षिका आहेत. कौस्तुभ डिलिव्हरी या कंपनीत वडधामना येथे नोकरीला होता. मात्र, चांगल्या नव्या नोकरीच्या शोधात त्याने पुण्याला निघाला होता. त्याला पुण्याहून दोन कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आले होते. त्याकरता विदर्भ ट्रॅव्हल्सने शुक्रवारी सायंकाळी तो पुण्याला निघाला. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन बैद्यनाथ चौकातून शुक्रवारी रात्री त्याने विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने सुरू केलेला प्रवास त्याच्यासाठी अंतिम ठरला. बसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबियांशी बोलला. मात्र, शनिवारी सकाळी बसचा अपघात झाल्याची बातमी आली आणी कुटुंबीय चिंतेत पडलं वृद्ध आईवडिलांचा आधारस्तंभ हरवल्याचे कळलं आणि मग सर्वत्र सुन्न आक्रोश झाला.

कुटुंबाला आधार देण्यासाठी कौस्तुभ धडपडत होता

कौस्तुभचे वडील काही काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. वडिलांचे उपचार, बहिणींना आधार देण्यासाठी कौस्तुभ धडपडत होता. मात्र नियतीला त्याची ही धडपड पाहवली नाही. त्याच्या अपघाताची बातमी त्याच्या आईवडिलांना सुन्न करून गेल मृत्यू झालेल्या मुलाचा चेहरा पाहता न आल्याने त्याच्या आईचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.

अपघातातील मृतांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करणार

समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर उद्या सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीय. फॉरेन्सिक एक्सपर्टसन सोबत घेऊन नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. समृद्धी अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना मदतीसाठी अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना मदतीसाठी वर्ध्यातून बुलढाण्यासाठी महसूल आणि पोलिसांचं एक पथक रवाना झालंय. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ही माहिती दिलीय. महसूल आणि पोलिसांचं पथक रवाना झाले आहे. अपघातग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना मदतीसाठी  म्हणून जिल्हा प्रशासनानं पथक रवाना केलंय. बुलढाणा प्रशासनाच्या संपर्कात वर्ध्याचं जिल्हा प्रशासन आहे. या अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये वर्ध्यातून 14 प्रवासी बसलेले. त्यात 8 पुरुष,6 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश होता.