वजन कमी करायचे आहे? तर मग या कोंबड्याप्रमाणे व्यायाम करा, पाहा कसे ते...

Health conscious : तुम्हाला वजन घटवाय आहे का, तर कोंबड्यासारखा व्यायाम करा !  (Cock maintains his zero figure)

Updated: Oct 14, 2021, 11:51 AM IST
वजन कमी करायचे आहे? तर मग या कोंबड्याप्रमाणे व्यायाम करा, पाहा कसे ते...

सांगली : Health conscious : तुम्हाला वजन घटवाय आहे का, तर कोंबड्यासारखा व्यायाम करा ! बातमी एका हेल्थ कॉन्शियस कोंबड्याची. फिगर झिरो राहावी यासाठी तो बरेच कष्ट घेतो. कुठे आहे हा कोंबडा आणि तो काय करतो बघुयात... (Cock maintains his zero figure)

'झिरो फिगर' कोंबडा

कृष्णेच्या पात्रात कोंबड्याचे स्वीमिंग पाहायला मिळाले. सांगलीमधील कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या या कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा साधासुधा कोंबडा नाही. हा आहे फिगर कॉन्शियस कोंबडा. जाडजुड होणं, त्याला मान्यच नाही. त्यामुळे मग तो व्यायाम म्हणून नदीमध्ये दररोज स्वीमींग करतो. (Cock swimming in  Krishna river at Sangli)

हा कोंबडा लॅप्स मारतो आणि आपली तब्येत चांगली ठेवतो. हा झुंजीचा कोंबडा असल्यामुळे तो सडपातळ असणं आणि वजन नियंत्रणात असणं गरजेचे असल्याचे त्याच्या मालकाने सांगितले. त्यामुळे एकही दिवस त्याचा पोहोण्याचा एक्झरसाईज चुकत नाही. 

तुम्हालाही वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर विचार कसला करताय? नदी किंवा स्वीमिंग पूलमध्ये मारा उडी आणि करा पोहोण्याचा व्यायाम.