पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ

Pune Murder: पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 27, 2024, 12:07 PM IST
पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ title=
(प्रातिनिधिक फोटो)

Pune Murder: बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारासंबंधी अनेक घटना उघड होत असताना विरोधक आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आता आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पुणे शहरातून हत्येचा अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळले आहे. हत्या झालेल्या खून तरुणीचं वय अंदाजे 18 ते 30  असावे असा अंदाज आहे. 

Nashik News : नाशिक हादरलं! विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...

 

चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. 

रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार

रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णालयातील परिचारिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

तरुणी निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सापडली होती त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. तरुणी अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथेच पीडित तरुणीवर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील परिचारिकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी काम बंद करून रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाजदेखील बंद केले आहे.