प्रणव पोळेकर झी मीडिया, संगमेश्वर : चक्क पाच पिढ्यांपासून एक कुटुंब हे गणेशमूर्ती साकारत आहे. रत्नागिरीतल्या संगमेश्वरमध्ये ही चित्रशाळा असून तिला तब्बल १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. संगमेश्वर बाजारपेठेत प्रसादे कुटुंबाचा गणेशमुर्तीचा कारखाना आहे. १०० वर्ष या कारखान्याला पूर्ण झाली आहेत. या गणेशचित्रशाळेत सुबक मूर्ती बनवल्या जातातच. मात्र प्रसादे यांच्या पाच पिढ्या इथं गणेशमुर्ती घडवण्याचे काम करत आहेत. विठोबा प्रसादे यांनी ही गणेशचित्र शाळा सुरु केली होती. त्यानंतर आता प्रसादे कुटुंबातील त्यांची मुलं आणि पुतणे पुतणी देखील हा वारसा पुढे चालवत आहेत.
अशोक यांच्यासोबत घरातील अनेक मंडळी गणपतीची मूर्ती घडवताना पहायला मिळतात. प्रसादे यांच्या घरातील पुतण्यानी सुद्धा या गणेशचित्र शाळेत रस घेतला. उच्च शिक्षण घेतलेल्या प्रसादे कुटुंबातील सुद्धा या व्यवसायाती आवडीनं काम करतात. स्वरा तर गणपतीची रेखणी म्हणजे डोळे काढण्याचं अवघड काम करते.
या गणेशमूर्ती पूर्णपेणे पर्यावरण पुरक असतात. शाडूच्या मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेशमूर्ती प्रसादे यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेशभक्त घेऊन जातात.
प्रसादे कुटुंबांला या व्यवसायातून पैसा किती मिळेल किंवा नफा किती मिळेल याचा विचार करत नाहीत. त्यामुळेच हा गणेश कारखाना वेगळेपणा जपतो आहे.