कलम ३७० वरून जेपी नड्डा यांचा कॉंग्रेसवर निशाणा

कलम 370 हटवल्याने जम्मू कश्मीर मधील नागरीकांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य मिळालंय.

Updated: Aug 29, 2019, 02:02 PM IST
कलम ३७० वरून जेपी नड्डा यांचा कॉंग्रेसवर निशाणा  title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : कलम 370 हटवल्याने जम्मू कश्मीर मधील नागरीकांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य मिळालंय. मात्र काँग्रेसवाले कलम 370 वरून राजकारण करत आहेत अशी टीका करत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आज भाजपाची महाजनादेश यात्रा जालन्यात पोहचली. यानंतर आयोजित सभेत नड्डा यांनी काँगेसवर कलम 370 वरून निशाणा साधला. कलम 370 देश हितासाठी होतं तर मग त्याला काँग्रेसने कायम का केलं नाही ? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला.

वोट बँकेचं राजकारण करायचं असल्याने काँग्रेसने ट्रिपल तलाक वरूनही राजकारण केलं अशीही टीका नड्डा यांनी केली. जो विकास पंतप्रधानांच्या नेतृत्वात 75 दिवसांत झाला त्याला आपण विसरू शकत नाही असंही नड्डा यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बलशाली भारत तयार होत असून त्याकडे कुणीही वाईट नजरेने पाहणार नाही. आपल्याला समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे. यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केलं. दरम्यान भाजपामध्ये इतर पक्षातील नेते प्रवेश करत असताना त्या नेत्यांना आम्ही निरमा पावडरने स्वच्छ धुवुनच प्रवेश देतो अशी पुस्ती भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोडली.