मुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video

chandrapur news: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Updated: Dec 4, 2022, 04:42 PM IST
मुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी अशीच एक घटना घडली होती जेव्हा एका मुलीची छेडछाड (boys teasing girl on road) काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला परिसरातल्या लोकांनी बदम मारलं होतं. सध्या असाच काहीसा प्रकार चंद्रपुर (chadrapur) शहरात घडला आहे. येथे एका शालेय विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली आहे. अशाच एका परिसरात एका विद्यार्थिनीची छेडछाड (students) काढण्यात आली आहे. या घडला प्रकार पाहून विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातच जागरूक युवकांच्या मदतीनं त्या आरोपीला पकडून बेदम धुलाई केली आहे. धुलाई करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. (a group of girls fights with the boy who tried to tease a school students)

चंद्रपुरच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असून या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून घटनेचा तपास करून आरोपीला पकडून बेदम धुलाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल (crime news) केले आहेत. म्हणजेच छेड काढणाऱ्याला आणि त्याची बेदम धुलाई करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या भागात सातत्याने शालेय विद्यार्थिनी विरोधात छेडखानीचे प्रकार होत असताना विद्यार्थिनींनी स्वतःच यात पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा - Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...

धुलाई केली सुसाट 

सततच्या छेडछाडीने त्रस्त विद्यार्थिनींनी आपल्या पद्धतीने उपाय करत केलेला हा करेक्ट कार्यक्रम आहे. त्यांच्या मदतीला परिसरातील युवकही धावून आले. या आरोपीने चंद्रपुरात चक्क शाळेच्या परिसरात शालेय विद्यार्थिनींची छेड काढली. विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातच होत असलेला हा प्रकार जागरूक युवकांच्या कानी (youngsters) घातला. मग काय आरोपीला पकडून बेदम धुलाई करण्यात आली. शालेय विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहापर्यंत जाणेही असह्य करणाऱ्या गावगुंडाचा हा मारहाणीचा (fighting) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओवरून ठिकाण हुडकून पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या भागात सातत्याने शालेय विद्यार्थिनीसंदर्भात छेडखानीचे प्रकार होत असताना विद्यार्थिनींनी स्वतःच उपाय शोधल्याने यापुढे मजनूगिरी करणाऱ्याना जरब बसेल अशी आशा आहे.

 

कोरिअन तरूणीनंतर...

खार परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात दोन तरुण रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर कोरियन तरुणीची (korean girl video) खुलेआम छेड काढत होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. ही तरूणी साउथ कोरिया येथील होती, लाईव्ह स्ट्रिमिंग (live news) दरम्यान दोन तरुणांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप तिने केला होता. त्यातला एक तरूण तिला जबरदस्ती किस (kiss) करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर या तरूणीला मदत करण्यासाठी दोन तरूणांनी धाव घेतली होती.