Dhule News : धुळ्यात एका बिबट्याची चांगलीच घालमेल झाली. पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याचं डोकं कळशीत अडकलं. तब्बल 5 तास तो त्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत होता. अखेर वन विभागाला बोलावण्यात आलं. त्यांच्या पथकानं कळशी कापून बिबट्याची सुखरुप सुटका केली आणि त्याला जंगलात सोडलं.
शिकरीच्या शोधात आलेल्या एक बिबट्याची चांगलीच फजिती झाल्याचा किस्सा सध्या धुळ्यात रंगतो आहे. धुळे जिल्ह्यातील जयरामनगर परिसरात रात्रीच्या सुमारास गोठ्यातून जोर जोराने भांडे आपटण्याचा आवाज येऊ लागल्याने शेतकऱ्याने गोठ्याकडे धाव घेतली. समोरच दृश्य बघून त्याला घाबरावं की कीव करावी असा प्रश्न पडला. गोठ्यात बिबट्याची मान हंड्यात अडकलल्याचे शेतकऱ्याने पहिले आणि तो हादरला.
हंड्याच्या बाहेर मान काढण्यासाठी बिबट्या सैरभर झालेला. अखेर प्राणी मित्र आणि वनविभागाचे पथक दाखल झाले.त्या बिबट्याला पिंजऱ्यात टाकत बेशुध्द केले आणि हंड्यातून बिबट्याची सुटका करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार घडला आहे साक्री तालुक्यातील जयरामनगर शिवारात ! जयरामनगर शिवारात कृष्णा चौरे यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान बिबट्या शिरला. शिकारीच्या शोधात बिबट्याने तांब्याच्या हंड्यात मान टाकली आणि तो अडकला. बिबट्या पाण्याच्या शोधात अडकला असेल असा एक कयास आहे. मानेला झटके दिल्याने मान हंड्यात पूर्णतः फसली. हंड्यात मान अडकल्याने बिबट्या अधिकच बिथरला. दिसत नसल्याने त्याला पळण्याचा अंदाजही घेता येत नव्हता.
मध्यरात्री नंतर गोठ्यातून भांडे आपटण्याचा आवाज येत असल्याने शेतकरी कृष्णा चौरे यांनी गोठ्यात धाव घेतली.तेथे बघतात तर हंड्यात मान अडकल्याने बिबट्या बिथरलेला दिसून आला.शेतकरी कृष्णा चौरे यांनी सरपंच कमलाकर साबळे यांना माहिती दिली.सरपंचांसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.वनविभागाला माहिती देण्यात आली. पहाटेच्या सुमारास वनविभाग व प्राणी मित्र घटनास्थळी आल्यानंतर बिबटला ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसून आले.अखेर पिंजऱ्यात टाकत बेशुध्द करत श्वास घेता यावे यासाठी हंड्याला कटर मशीनच्या मदतीने थोडे कापण्यात आले.अथक प्रयत्नानंतर अखेर हंड्याला तेलच्या मदतीने खेचून बेबट्याची तेथून सुटका करण्यात आली.
पुण्यातल्या मांजरीमध्ये उंदरे वस्तीत एक महिन्यापासून नागरिकांना बिबट्याचं दर्शन होतंय. बिबट्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनअधिकाऱ्यांना तक्रार करूनही बिबट्याला जेरबंद करण्यात येत नसल्याने जन आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी दिलाय.