प्रफुल्ला पवार, झी मीडिया, रायगड man falls down in chamber: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) 40 फुट खोल चेंबरमध्ये (Chamber) पडलेल्या वाहन चालकाला वाचवण्यात पोलिस आणि बचाव कार्य पथकाला यश आल आहे. माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून यशस्वी बचावकार्य करणाऱ्या पोलिस (Police) आणि बचावकार्य (Rescue Team) पथकांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. एक इसम अचानक रस्त्याच्या बाजूला (Road) असणाऱ्या खोल चेंबरमध्ये पडला. हे पाहून लोकांनी तातडीनं रेस्क्यू टीमला बोलावलं. त्यानुसार खोल पडलेल्या चेंबरमध्ये त्या माणसाला व्यवस्थित बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच आणि हायवे परिसरातील भागात रेस्क्यू टीमचं (People Praising the Rescue Team) कौतुक केलं जात आहे. (a man fall down in a 40 foot dip chamber recuses immediately)
मंगळवारी संध्याकाळी खोपोली जवळ आयशर टेंपो (Tempo) बंद पडला होता. या बंद पडलेल्या टेपोचा चालक मदत मिळवण्यासाठी रस्ता ओलांडत असताना रस्त्याच्या मधोमध असलेले 40 फुट खोल चेंबरमध्ये पडला. ही बाब लक्षात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात आली. त्या चालकाने समय सूचकतेने पोलीस हेल्पलाइनवर (Helplines) फोन केला. ही माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट (Borghat) वाहतूक पोलीसांसह मदत कार्यपथक घटनास्थळी दाखल झाले. 40 फुट खोल चेंबरमध्ये जाऊन अंदाज घेतला असता चालक गंभीर जखमी अवस्थेत अढळून आला. त्यावेळी त्याला स्ट्रेचरला रोपने बांधले आणि बाहेर काढले. उंचा वरून पडल्याने ड्रायव्हरचे हात पाय आणि कंबरेला दुखापत झाली असुन त्याला पुढील उपचारा करता जे. जे. हॉस्पिटल मुंबई (J. J. Hospital) येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
दैव बलवत्तर म्हणून वाहन चालकाचे प्राण वाचले. विकास राऊत (वय वर्ष 28) राहणार डोंबिवली (Dombivali) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे. या कामगीरी बद्दल बोरघाट वाहतूक पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल, मृत्युंजय देवदूत, खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या बचाव पथकांचे कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
बुधवार पेठेतील क्रांती चौकात काही तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा सीसीटीव्ही (CCTV) वायरल झाला होता. यामध्ये काही तरुण कोयत्याचा धाक दाखवून हाणामारी करत असल्याचे दिसून येत होते. रविवारी रात्री हा प्रकार घडूनही फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र माध्यमात यासंबंधीच्या बातम्या येतात पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा (Crime news Today Pune) दाखल करण्यात आला आहे. विशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव पुणे) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. यावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकी वरील तीन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ (Youngsters) करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.