सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता तीन वर्षांच्या एका मुलानं चक्क खिळा गिळला आहे. मात्र, डॉक्टरांनी चमत्कार केला आहे. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता डॉक्टरांनी खिळा बाहेर काढत या मुलाचे प्राण वाचवले आहेत (Shocking News).
कंधार तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. साडे तीन वर्षांच्या एका मुलानं चक्क खिळा गिळला. गणेश येलमिटवाड असे या मुलाचे नाव आहे. गणेश याने अडीच इंच लांबीचा लोखंडी खिळा गिळला. त्याला उलट्या होऊ लागल्यानं त्याला नांदेडमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर खिळा बाहेर काढला. विशेष म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया न करता एन्डॉस्कोपी करत खिळा काढण्यात आला आणि या मुलाला जीवदान मिळालं. सध्या मुलाची प्रकृती बरी आहे.
नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील हाळदा या गावात ही घटना घडलेय. साडे तीन वर्षीय गणेश अंगणात खेळत होता. यावेळी खेळता खेळता गणेश याने अडीच इंची लोखंडी खिळा गिळला. गणेशच्या पोटात आतमध्ये हा खिळा गेला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून कुठलीही शस्त्रक्रिया न करता या मुलाच्या पोटातून इंडोस्कोपी द्वारे हा खिळा बाहेर काढला. गणेशला उलट्या होत असल्याने त्याच्या पालकांनी त्याला नायगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले.
पण, डॉक्टरानी त्यांना नांदेडला पाठवले. नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात गणेशला दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी एका तासाच्या प्रयत्नाने खिळा बाहेर काढला. शस्त्रक्रिया न करता इंडॉस्कोपीद्वारे खिळा काढून मुलाला जीवदान दिले. इंडोस्कोपी द्वारे खिळा काढताना मुलाला कुठलीही इजा झाली नाही. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे. या घटनेमुळे मात्र आपल्या लहान मुलांकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा दिसून आले.