बाजारपेठेत दोन होळ्यांची अनोखी भेट; कोकणातील पारंपारिक आणि अनोखा शिमगोत्सव

कोकणात होलिकोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. 

Updated: Mar 24, 2024, 11:01 PM IST
बाजारपेठेत दोन होळ्यांची अनोखी भेट; कोकणातील पारंपारिक आणि अनोखा शिमगोत्सव  title=

Konkan Holi Festival 2024 : कोकणात शिमगोत्सव सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातोय यामध्ये विविध परंपारा पाहायला मिळतायत.  होळी मध्ये दोन पालख्या एकत्र येतात हे पाहिलंय पण दोन होळ्या एकत्र येतानाच द्रुश संगमेश्वरमध्ये असत संगमेश्वरमधील निनावी आणि वरदान देवीच्या होळ्या एकमेकीच्या भेटी साठी येतात यावेळी मोठ्या भक्ती भावाने ह्या होळ्या नाचवल्या जातात आणि या दोन्ही होळ्यांची भेट संगमेश्वर बाजारपेठेत होते.  

करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवात भाविकांचा जल्लोष

चिपळूणच्या करंजेश्वरी देवीचा शिमगोत्सव उत्साहात साजरा झाला. ढोलताशांच्या गजरात गोवळकोट मंदिरापासून वाजतगाजत देवीची पालखी काढण्यात आली. विशेष म्हणजे गुलालचा वापर न करता हा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने व शांततेत गुलालविरहित साजरा केला जातो. शेरणे कार्यक्रमामुळे या देवस्थानचा शिमगोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या उत्सवला महत्व आहे जत्रेचे स्वरूप या शिमगो उत्सवाला येत या या कार्यक्रमाला सिंधू रत्न योजनेचे सदस्य किरण सामंत, आमदार शेखर निकम यावेळी उपस्थित होते

संत तुकाराम महाराजांच्या देहूत होळीचा उत्साह

होळीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात सुरू असून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूत देहू संस्थानच्यावतीने मुख्य मंदिरातील महाद्वारा समोर होळीचा सण साजरा करण्यात आला. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वार समोर देवस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे तसेच विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्या हस्ते होलीका मातेचं पूजन करण्यात आलं..यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी होळी पेटताच पांडुरंगाचे नामस्मरण केलं. संत तुकोबांच्या मुख्य मंदिरातील होळी प्रज्वलीत होताच सर्व देहू गावातील घरोघरी होळया एकाच वेळी पेटवल्या जातात. साडेतीनशे वर्षाची ही परंपरा देहूकर अजूनही जपत आहे..

होळीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती कडूनही पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. संत नामदेव पायरी जवळ होळी पूजन आणि डफाचे पूजन करून होळी प्रज्वलित केली.