आई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...

भावनिक कारणं सांगून गंडवणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.    

Updated: Jun 29, 2023, 11:27 PM IST
आई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...   title=

Mumbai MNS : आईच्या आजारपणाचे खोटे कारण सांगून पैसे उकळणाऱ्या भामट्या तरुणास मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच  चोप दिला आहे. ठाण्यात हा प्रकार घडला आहे. या तरुणाने अनेकांना गंडा घालत हजारो रुपये उकळले होते. मनसे कार्यकर्त्यांनी याला रेड हँड पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. 

सोशल मिडियावरुन मोबाईल नंबर मिळवून हा तरुण आईच्या आजारपणाच्या नावावर पैसे उकळत होता. या तरुणाला रंगेहाथ पकडुन मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. विजय तीवर असे या तरुणाचे नाव आहे. तो ठाण्यात राहणारा आहे. आईच्या आजाराच्या नावावर मनसे पदाधिकाऱ्यांकडून तो वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले होते. फेसबुकवरून मोबाईल नंबर शोधून अनेकांना आई आजारी आहे असे सांगून हा पैसे घेत होता. पुन्हा नंतर परत आईचे निधन झाले  अशी खोटी बतावणी करून खोटे नाव सांगून पैसे घेतल्यावर या तरुणाचा खोटारडेपणा उघड झाला. 

आईच्या अंत्यविधी आणि अस्थी विसर्जनासाठी वारंवार पैसे मागत असल्याचे निदर्शानास आले. मोबाईल फोनवर संपर्क करून आई जिवंत असताना अस्थी विसर्जनासाठी पैशांची मागणी करत असल्याने पालघर येथे अस्थिविसर्जन करायला जावे लागणार असल्याची बतावणी या तरुणाने केली. या तरुणाचा पर्दाफाश करण्यासाठी नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांनी या तरुणाला ठाणे येथे गाठले.

अस्थिविसर्जनसाठी पालघरला जावे लागणार आहे म्हणून परत  दीड हजार रुपये मागितल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांना शंका आल्याने पैसे मागणार इसम विजय तीवर याला मनसे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ठाणे येथे जाऊन पकडून चोप दिला आणि नंतर सदर तरुणाला वागळे इस्टेट पोलिसांच्या हवाली केले.