नाशिकमध्ये आधार कार्डातील चुका दुरूस्त करणं कठीण

   नाशिक जिल्ह्यात आधारकार्ड काढणं आणि दुरुस्त करणे अवघड बनलंय. अनेक खाजगी सेन्टर्स बंद करण्यात आलेत. केवळ सरकारी यंत्रांणा कार्यरत झाली.

Updated: Dec 21, 2017, 06:01 PM IST
नाशिकमध्ये आधार कार्डातील चुका दुरूस्त करणं कठीण   title=

योगेश खरे झी मीडिया नाशिक  :   नाशिक जिल्ह्यात आधारकार्ड काढणं आणि दुरुस्त करणे अवघड बनलंय. अनेक खाजगी सेन्टर्स बंद करण्यात आलेत. केवळ सरकारी यंत्रांणा कार्यरत झाली.

अचानक झालेल्या या निर्णयाने आणी अपु-या सेंटर्समुलळे लोकांची तारांबळ उडाली आहे.  

आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकाची महत्वपूर्ण ओळख बनलीये. यात प्रत्येक नागरिकाचा डिजिटल डेटा त्याची शारीरिक ओळख असते. मात्र अनेक  डेटा हॅकर्सच्या वेबवर म्हणजे डार्क नेट वर उपलब्ध झाला.. यावरुन सुप्रीम कोर्टाने या प्रणालीवर ताशेरे ओढले.. त्यामुळे  केंद्राने यासाठी अनेक खाजगी लोकांचे अधिकार काढून घेतलेय 

नागरिकांची तारांबळ  

 बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतल्यांनं सामान्यांची तारांबळ उडाली.. आधार कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त करणं, नवं आधार कार्ड बनवणं कठीण बनलंय..

डिजिटल व्यवहारात फसवणूक 

अनेक डिजिटल व्यवहारात फसवणूक होत आहे.. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्याची गरज आहे.. शाळाशाळांतून शिक्षकांच्या माध्यमातून हे काम होऊ शकते. आता प्राधान्याने ही मोहिम पुन्हा हाती घेण्याची गरज आहे.