रायगड : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या भयंकर दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. केवळ एका प्रवाशाला वाचवण्यात यश आल्याचं समजतंय. अपघातात बसमधली ३४ पैंकी ३३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेबद्दल देशभरातून दु:ख केलं जातंय. केवळ एक प्रवासी या अपघातातून सुदैवानं वाचलाय. प्रकाश सावंतदेसाई असं या प्रवाशांचं नाव आहे. हाती लागलेल्या सर्व मृतदेह आणि जखमी झालेल्या प्रकाश सावंतदेसाई यांना पोलादपूरच्या ग्रामीम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
Pained by the loss of lives due to a bus accident in Maharashtra's Raigad district. My condolences to those who lost their loved ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 28, 2018
आत्तापर्यंत आठ-दहा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालंय.चालकाचं नियंत्रण सुटून बस २५० ते ३०० फूट दरीत कोसळली.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झालेल्या बस अपघाताचे वृत्त ऐकून फार दुःख झाले.अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मदतकार्य सुरु आहे.शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.- राष्ट्रपती कोविंद
— President of India (@rashtrapatibhvn) July 28, 2018
पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय.
Pained to know about the loss of lives in Mahabaleshwar bus accident.Administration taking all efforts to provide required assistance.
Senior officials&emergency management systems in place.
My thoughts are with families who lost loved ones&prayers for speedy recovery of injured.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2018
पोलीस यंत्रणा , तसेच महाबळेश्वर आणि रायगडमधून ट्रेकर्स मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्यातून एनडीआरएफचं एक पथक तातडीनं घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलंय. घाटात दाट धुके असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. या बसमध्ये एकूण ३४ प्रवासी होते... हे सर्व जण कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक आहे वेडीवाकडी वळणे असल्याने अनेकदा या भागात अपघात होत असतात.