नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी

नागपूरमध्ये मेट्रो काम प्रगतीपथावर असताना बांधकाम होताना काळजी न घेतल्याने अपघात घडला. पिलरवरुन लोखंडी वस्तू खाली पडल्यानं बाईकवरुन जाणा-या एकाच कुटुंबातील तिघीजणी जखमी झाल्या.

Updated: Oct 8, 2017, 05:01 PM IST
नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी  title=

नागपूर : नागपूरमध्ये मेट्रो काम प्रगतीपथावर असताना बांधकाम होताना काळजी न घेतल्याने अपघात घडला. पिलरवरुन लोखंडी वस्तू खाली पडल्यानं बाईकवरुन जाणा-या एकाच कुटुंबातील तिघीजणी जखमी झाल्या. सासू आणि नात किरकोळ जखमी झाली असून सून गंभीर आहे. त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले आहे.

अमी जोशी असं गंभीर जखमी महिलेचं नाव आहे. आबंडेकर चौकात ही घटना घडली असून सुदैवानं रविवार असल्यानं जास्त वरदळ या भागात नव्हती. अपघात घडला तेव्हा कर्मचीर पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. दरम्यानं एकंदरीत नागरिकांच्या सुरक्षिततेवर नाराजी व्यक्त होतेय.