ज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शाह यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक मु. ब. शाह यांचं निधन झाले आहे. वृद्धापकाळाने धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated: Oct 8, 2017, 01:11 PM IST
 title=

धुळे: ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक मु. ब. शाह यांचं निधन झाले आहे. वृद्धापकाळाने धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शहा यांनी 50 हून अधिक पुस्तकांचं लेखन केलं. यात राजवाडे संशोधन मंडळाच्या तेरा खंडांचे संपादन, गांधी विचार, साने गुरूजीच्या कथाचे हिंदीत भाषांतर यांचा समावेश आहे. गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार, इतिसाह संशोधन, अनुवाद आणि हिंदी साहित्यात त्यांचं मोठं योगदान आहे. याशिवाय राष्ट्रभाषा सभा, राष्ट्रसेवा दल, आंतरभारती या संस्थांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. शहा यांच्या निधनामुळे सामाजिक संघटनांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होतेय.