मनमाड-येवला मार्गावर भीषण अपघात

बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Updated: Oct 10, 2017, 01:03 PM IST
मनमाड-येवला मार्गावर भीषण अपघात title=

मनमाड : बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी नाशिक, मालेगावला हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनमाड शहरापासून जवळच असलेल्या डीएड कॉलेज परिसरात नंदुरबार पंढरपूर बसला हा अपघात झाला. बस मनमाडहून पंढरपूरकडे जात असताना बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर जबर धडक झाली. यात सुदैवानं कुठलही जिवीतहानी झाली नाही. यात 27 प्रवासी झालेत. तर चालक-वाहकासह पाच जण गंभीर जखमी आहेत.

दरम्यान, रस्ते अपघात हा विषय आता नवा राहिलेला नाही. दररोज शेकडो लोकांचे केवळ रस्ते अपघातात मृत्यू होतात. सरकारकडूनही अनेकदा हे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु, प्रवासी आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा, प्रशासनाची उदासिनता, रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे, निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम आदी गोष्टींमुळे रस्ते अपघातात वाढ होताना दिसते आहे.

दरम्यान, अनेकदा वाहनचालक हे हव्या त्या प्रमाणात प्रशिक्षित नसतात. काही वेळा ते शारीरिकदृष्ट्याही सक्षम नसतात. काही चालकांना मद्य किंवा इतर अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन असते. अशा वेळी नशेमध्ये वाहन चालविल्यानंतरही होणाऱ्या अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसते.

अपघात टाळण्यासाठी काय कराल?

प्रवासावर निघताना आपल्या वाहनाची योग्य ती तपासणी करून घ्या.

तुम्ही स्वत: वाहान चालवत असाल तर, आपली प्रकृती ठिक आहे किंवा नाही. झोप व्यवस्थित झाली आहे किंवा नाही हे स्वत:लाच विचारा.

चालकाद्वारे वाहान चालवत असाल तर, तोही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ठिक आहे का ते पाहा. चालक किंवा तुम्ही स्वत:ही प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. मद्य, अंमली पदार्थ आदी गोष्टींचे सेवन टाळा.

शासकीय वाहनांचा प्रवास कैक पटीने सुरक्षित समजला जातो. तरीही शासकीय वाहनाने प्रवास करत असताना चालकावर नजर ठेवा. सावध राहा. वाहनाचा वेग योग्य आहे किंवा नाही याकडेही लक्ष द्या. काही संशयास्पद वाटल्यास सोबतच्या प्रवाशांना माहिती द्या. योग्य यंत्रणेला माहिती द्या.