टॅक्सी - रिक्षानंतर आता ओला उबर कॅबचीही होणार भाडेवाढ?

काही दिवसांपूर्वी टॅक्सी-रिक्षा चालकांनी मागणी केल्यानंतर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला

Updated: Aug 6, 2022, 04:53 PM IST
टॅक्सी - रिक्षानंतर आता ओला उबर कॅबचीही होणार भाडेवाढ? title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : वाढत्या महागाईसोबत इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबत  सीएनजीचे दरही आभाळाला स्पर्श करत आहेत.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांनी भाडेवाढीची मागणी केली होती. यासाठी चालकांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता त्यानंतर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यानंतर आता इंधन आणि सीएनजी दरवाढीवरुन ओला उबर चालकांनीही संपाची हाक दिली आहे. वाढत्या दरामुळे ओला उबर चालकांनी भाडेवाढीची मागणी केली आहे.

भाडेवाडीबद्दल ओला उबेर कंपन्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि यासाठी राज्य परिवहन विभागाने ही प्रयत्न करावा अशी मागणी ओला उबर चालकांनी केली आहे.

केंद्र सरकारने ॲप बेस्ड चालकांसाठी बनवलेली ॲग्रीगेटर २०२० नियमावली राज्याने लागू करण्याची ही मागणी ओला उबर चालकांनी केली आहे. दरम्यान, भाडेवाढ न मिळाल्यास ओला उबेर चालकांनी ही संप आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे.