'धामणा' पाठोपाठ जुई धरणाच्या सांडव्यालाही 5 ठिकाणी गळती

 दानापूर गावातील जुई धरणाच्या सांडव्यालाही 5 ठिकाणी गळती लागली आहे. 

Updated: Jul 5, 2019, 03:47 PM IST
'धामणा' पाठोपाठ जुई धरणाच्या सांडव्यालाही 5 ठिकाणी गळती title=

नितेश महाजन, झी मीडिया,जालना : तिवरे धरण फुटून १८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यात राज्यभरातील धरण गळतीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे धरणे अनेकांच्या जीवावर उठली आहेत. जालन्यातील धामणा धरणाला गळती लागल्याचे वृत्त समोर आले होते. आता या पाठोपाठ दानापूर गावातील जुई धरणाच्या सांडव्यालाही 5 ठिकाणी गळती लागली आहे. 

परिसरातील नागरिकांनी जुई धरणाच्या गळती दुरुस्तीची मागणी केली आहे. 6 वर्षांपासून कोरड्या पडलेल्या या धरणात आजघडीला 99 टक्के पाणीसाठा झालाय.भोकरदन शहरासह परीसरातील 25 गावांची तहान भागवण्या बरोबरच शेतीसाठी देखील या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

आज जरी होणारी गळती कमी प्रमाणात असली तरी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून गळती रोखावी जेणेकरून होणारी दुर्घटना टाळता येईल अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.