'स्पेशल 26' पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला

क्राईम पट्रोल, सावधान इंडिया सारखे क्राईम शो पाहून गुन्ह्यांचे प्लानिंग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता नवी मुंबईत एका गँगने  'स्पेशल 26' चित्रपट पाहून 34 लाखांचा डल्ला मारला आहे. 

Updated: Jul 31, 2023, 09:07 PM IST
'स्पेशल 26' पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला    title=

Navi Mumbai Crime News : 'स्पेशल 26' चित्रपटात (special 26) अभिनेता अक्षय कुमार हा आपल्या टोळीच्या मदतीने राजकारणी तसेच बड्या व्यापाऱ्यांच्या घरावर बानवट धाडी टाकून त्यांना लुटतो. नवी मुबंईत 'स्पेशल 26' सारखरी खरीखुरी स्टोरी घडली आहे. एका गँगने 'स्पेशल 26' चित्रपट पाहून प्लान बनवला. या टोळीने नवी मुंबईतील बड्या व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली आहे. अवघ्या तासाभरात या गँगने 34 लाखांवर डल्ला मारला आहे.  पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केली आहे.     

नवी मुंबईत स्पेशल 26 चा थरार

अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून कांतीलाल यादव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची चोरी करणाऱ्या आरोपींना रबाळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. स्पेशल 26 हा चित्रपट पाहून या आरोपींनी तंतोतंत त्या चित्रपटाप्रमाणे केवळ सव्वा तासात ही धाड टाकण्याची किमया केली आहे. 

6 जणांनी मिळून ही धाड टाकत घरातील 34 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कांतीलाल यादव यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. रबाळे पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपास करत गुन्ह्यात सहभागी एकूण 11 जणांना  केले आहे. आरोपींकडून केलेल्या चौकशीत कार, रोख रक्कम, पिस्टल असा एकुण 25 लाख 25 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत असून पोलीस याप्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

नाशिक मध्ये साडेचार लाखाचे मोबाइल जप्त, दोन जणांना अटक

नाशिक शहरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख 70 हजाराचे 36 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.  शहरातील मुंबई नाका आणि सातपूर पोलीस ठाण्यात तरुणांनी मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबनाका आणि सातपूर पोलिसांनी दोन संशयित आरोपीला अटक केली आहे. यांची कसून चौकशी केली असता एकाकडे 93 हजाराचे आणि एकाकडून 3 लाख 75 हजारचे असे एकूण 4 लाख 70 हजार रुपयांचे 36 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दोघंही संशयित आरोपींकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.