पुणे : पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झालाय.
एका सुशिक्षित डॉक्टरनं मांत्रिकाला बोलावून एका अत्यवस्थ महिलेचा तंत्रमंत्राचा वापर केल्याचं प्रकरण पुढे आलंय. संध्या सोनावणे, असं या महिलेचं नाव आहे.
महिलेच्या छातीत दुधाची गाठ तयार झाली होती. आरोपी डॉक्टर सतीश चव्हाण या महिलेवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या महिलेची तब्येत खालावल्याने मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.
तिथे उपचार सुरू असताना डॉक्टर सतिश चव्हाण एका मांत्रिकाला घेऊन आले. मांत्रिकाने रुग्णालयातच त्याचे तंत्र मंत्र विधी केले.
मात्र, काल संध्याकाळी सोनवणे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.