अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कर्जत येथील तौसिफ शेख या व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्यानं एकाच खळबळ उडालीय.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पीर दावल मलिक ट्रस्टच्या जागेत झालेल्या अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे या मागणी साठी तौसिफ शेख हे काही महिन्यांपासून मागणी करत आंदोलन करत होते.
आश्वासन देऊनही पोलीस-प्रशासनानं दावल मलिक ट्रस्ट च्या जागेतील अनधिकृत बांधकाम काढलं नसल्याने त्यांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत.