ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय 

Updated: Oct 12, 2018, 11:06 PM IST
ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय title=

रायगड : ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय होत असल्याने वस्तीची फेरी न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यात दररोज ८० बसेस वेगवेगळ्या गावांमध्ये वस्तीला असतात. मात्र, त्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वस्तीच्या गाड्या घेऊन जाणाऱ्या वाहक आणि चालकांची राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. मात्र अनेक गावात अशी सोयच नसल्याने त्यांना एसटीत झोपावं लागतंय. पावसाळ्यात गळक्या बसेसमध्ये रात्र काढावी लागते. अनेकदा विंचू साप यासारख्या विषारी प्राण्यांची भीती असते, अशा अनेक तक्रारी करण्या आल्यात.

तसेच अलिकडच्या काळात एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या महिला वाहकांची तर खूपच कुचंबणा होते. याविरोधात एसटी वाहक-चालकांनी आक्रमक भूमिक घेत गाडी घेऊन जायची नाही, असा आक्रमक पवित्रा घेतलाय.