चालत्या बसमध्ये खून करणाऱ्या अजित कान्हूरकरला अटक

पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये चालत्या बसमध्ये खून करणाऱ्या अजित कान्हूरकरला पोलिसांनी अटक केलीय. खेड तालुक्यातल्या उसाच्या  शेतातून अजितला अटक करण्यात आली. 

Updated: Jun 13, 2018, 11:13 PM IST
चालत्या बसमध्ये खून करणाऱ्या अजित कान्हूरकरला अटक

पुणे : पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये चालत्या बसमध्ये खून करणाऱ्या अजित कान्हूरकरला पोलिसांनी अटक केलीय. खेड तालुक्यातल्या उसाच्या  शेतातून अजितला अटक करण्यात आली. पन्नास पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली.... मंगळवारी खेडमध्ये चालत्या बसमध्ये अजित कान्हूरकर यानं तक्रारदाराच्या भावाचा कोयत्यानं वार करुन खून केला होता. एका मुलीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अजित कान्हूरकर याच्याविरोधात मुलीच्या भावानं तक्रार केली होती. मोकाट असलेला अजित आणि तक्रारदार मुलीचा भाऊ दावडी राजगुरूनगर या एसटीत बसले होते. 

एसटी निम्म्या रस्त्यात आल्यावर अजितनं या तक्रारदारावर कोयत्यानं वार करत त्याचा खून केला. त्यानंतर अजित कान्हूरकर फरार होता, त्याला आता जेरबंद करण्यात आलंय.