रोहिणींच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला नवे बळ - अजित पवार

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत

Updated: Oct 23, 2020, 06:19 PM IST
रोहिणींच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला नवे बळ - अजित पवार

मुंबई : खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी स्वागत केले आहे. 

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये  हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या  ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यक्तीमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले.  