देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Updated: Mar 10, 2023, 08:25 AM IST
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना  500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप  title=

Ajit Pawar on  500 crores of corruption : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar's serious allegation 500 crores of corruption )  2017-18 या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच 500  कोटींच्या जाहिराती मंजूर केल्या असा आरोप करण्यात आला आहे.  (500 crore corruption in Information Public Relations Department Say Ajit Pawar)

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीत हे अधिकारी दोषी आढळले आहेत. पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, असं पवार यांनी विधानसभेत म्हटले आहे. विद्यमान मुख्यमंत्री यावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत,  असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. या आरोपानंतर आता राज्य सरकार काय उत्तर देणार याचीही उत्सुकता आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशात विरोधक सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भ्रष्टाराचा आरोप करताना अजित पवार यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील माहिती आणि जनसंपर्क विभागात मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता ‘मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले’ असा शेरा नस्तीवर लिहून 500 कोटी रुपयांच्या जाहिराती फडणवीस सरकारच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी दिल्या आहेत. हा गैरव्यवहार आहे. 

एखाद्या गोष्टीला मान्यताच नसल्याने संबंधित जाहिरात संस्थेला द्यायची 2019-20 ची बिले वित्त विभागाने रोखून धरलेली आहेत. आता मुख्यमंत्र्यांची कार्योत्तर परवानगी घेऊन बिले अदा करण्याचे आदेश देऊन या घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, ही गंभीर बाब आहे. या घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता तातडीनं निलंबित करावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.