अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
रणजीत पाटील यांनी नियमबाह्य निविदा मंजूर करण्यासाठी दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप अकोला जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केलाय.
यासंदर्भात त्यांनी थेट राजीनामापत्रच ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठवलंय. रणजीत पाटील अपमानास्पद वागणूक देत असल्यानं स्वेच्छा निवृत्त घेत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलंय.
सुभाष पवार यांच्या 'लेटरबाँब'मूळे डॉ. रणजित पाटील अडचणीत आले आहेत. रणजीत पाटील मंत्रीपदाचा धाक दाखवत कारवाईच्या धमक्या देत असल्याचाही आरोप पवारांनी केलाय.