औषधांच्या कार्यालयात दिवसरात्र चालतंय चिअर्सssss? धक्कादायक प्रकार समोर

Akola Beer Bottles found in Medical Office today: सध्या दारूच्या (beer bottles) बाटल्या मिळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक ठिकाणी किंबहूना सरकारी कार्यालयातही (government office) अनेकदा दारूच्या बाटल्या, आणि इतर संबंधित घटक मिळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तेव्हा अशावेळी आता सक्त कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या अकोला (akola) येथे असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. 

Updated: Dec 10, 2022, 10:46 AM IST
औषधांच्या कार्यालयात दिवसरात्र चालतंय चिअर्सssss? धक्कादायक प्रकार समोर  title=
akola news today

जयेश जगड, झी मीडिया, अकोला: हल्ली रूग्णालयं, सरकारी कार्यालयात (government offices) अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. त्यातून सध्या समोर आलेल्या माहितीनूसार अशा कार्यालयांमध्ये दारूचे अड्डेही बसवले जात आहेत. रात्री किंवा संध्याकाळी ऑफिसेस संपल्यानंतर तर दारूच्या नशेत अनेक कर्मचारी बुडालेले दिसत आहेत. सध्या हा प्रकार सगळ्यात गंभीर असून यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या असाच एक प्रकार समोर आला त्यामुळे पुन्हा एकदा ही बाब अधिक गंभीर झाली आहे. सध्याच्या जमान्यात दारूचा वापर प्रचंड वाढू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालणंही बंधनकारक झालं आहे. अकोल्यामध्ये (akola) एका औषध कार्यालयात रातोरात दारूच्या पार्ट्या होत असल्याचं समोर आलं आहे. (akola news beer bottles in medical office shocking evidence found know more)

अकोला शहरातील नेहरू पार्क चौक येथील सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन कार्यलय परिसरात दारूच्या बाटल्याचा ढिगार आढळून आला आहे. सदर प्रकारामुळे या कार्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तर्कवितर्क उपस्थित केला जात आहेत. अन्न व औषधी प्रशासनाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा ढीग दिसून आल्याने या ठिकाणी कामकाज करणारे कर्मचारी कार्यालय बंद झाल्यावर ओल्या पार्ट्या (partying) करतात की बाहेरील लोक येथे पार्ट्या करतात किंवा येथे स्वच्छता होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या गंभीर बाबींकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून याची निदान चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - Cold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

शासकीय कार्यालय की दारूचा अड्डा? 

अनेकदा शासकीय कार्यालयात ओल्या पार्टी सुरू असल्याच्या बातम्या आपण नेहमी पाहतो म्हणून अकोल्यातील अन्न व औषधी प्रशासनाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्याचं नवल काही वाटणार नाही. मात्र या घटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने त्यांचा आदिनस्त कार्यालयात काम करणारे कर्मचारी मनमाणी पद्धतीने काम करतात का असा प्रश्न उपस्थित होतो. अनेक शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी कार्यालयीन वेळ संपल्यावर ओल्या पार्ट्या (party in midnight) देखील करतात.एक खळबळजनक प्रकार अकोला शहरातील नेहरू पार्क चौक स्थित सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन कार्यालय परिसरात उघडकीस आला आहे. येथे दारूच्या रिकाम्या बतल्याचा ढीग आढळून आला आहे. या प्रकारामुळे कार्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तर्कवितर्क उपस्थित केला जात आहे. 

अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाच्या आवर भिंतीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा ढीग आढळून आला आहे. हे चित्र पाहून या ठिकाणी कामकाज करणारे कर्मचारी, अधिकारी किंवा बाहेरील व्यक्ती कार्यालय बंद झाल्यावर ओल्या पार्ट्या करतात हे मात्र स्पष्ट आहे. वरील पैकी कुणी ही नसेल तर येथील सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुकानदारांना कायद्याचे धडे शिकवणाऱ्या कार्यालयातच जर असे अवैध कृत्य होत असले तर समाजात याचा संदेश काय जाणार याचा विचार झाला पाहिजे. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी आणि मंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

रेल्वेतून दारूच्या बाटल्यांची वाहतूक

पुणे-एर्णाकुलम एक्सप्रेसमध्ये (pune) 400 बाटल्या सापडल्या आहेत. रेल्वेतून दारूच्या बाटल्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचाही समावेश आहे. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये विविध हायफाय ब्रँडच्या 400 बाटल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांना सापडल्या आहेत. यामुळे रेल्वेतून तस्करी करणार्‍यांची धुडगूस सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.अनधिकृतरित्या रेल्वेतून विविध वस्तुंची वाहतूक झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच घटना ही घडली आहे. दक्षिण भागातील एर्नाकुलम येथून एक गाडी पुण्यासाठी (पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस) येत असते. याच गाडीतून तब्बल 400 बाटल्या पुण्यात आणण्यात येत होत्या. त्यावेळी पुण्यातील रेल्वे सुरक्षा बलाला खबर्‍यांमार्फत या तस्करीबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच सकाळी 7 च्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला आणि संशयित व्यक्तींना पकडून त्यांच्या 4 अवजड बॅगांची तपासणी केली. त्यात अधिकार्‍यांना या एकूण 400 बाटल्या सापडल्या. हा सर्व माल 1 लाख 8 हजार 465 रूपयांचा होता. एक महिला व एक पुरूष व्यक्ती यांना आरपीएफ अधिकार्‍यांनी मालासह पकडले आहे.