अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव मोहीम तीव्र

अंबाबाई मंदिरातली पुजारी हटाव मोहीम आता आणखी तीव्र होणार आहे. याचाच भाग म्हणून अंबाबाई भक्त आज मातेला साकडं घालणार आहेत. 

Updated: Jun 18, 2017, 12:15 PM IST
अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव मोहीम तीव्र title=
छाया सौजन्य : DNA

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातली पुजारी हटाव मोहीम आता आणखी तीव्र होणार आहे. याचाच भाग म्हणून अंबाबाई भक्त आज मातेला साकडं घालणार आहेत. 

दहा दिवसांत प्रशानानं बैठक घेऊन या प्रश्नी निर्णय घ्यावा, अन्यथा मंदिराचे सर्व दरवाजे बंद करुन पुजा-यांना आत जाण्यास मज्जाव करणार असल्याचा पवित्रा भक्तांनी घेतला आहे. 

दरम्यान मंदिर परिसरात अंबाबाई भक्तांनी पुजा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर गाभा-यात जाणा-या काही भक्तांना पोलिसांनी रोखले.