राष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह

 भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले.  

Updated: Jul 8, 2018, 11:14 PM IST
राष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह title=

पुणे : आजच्या राजकारण्यांनी कसे जगावे, याचा आदर्श आर्य चाणक्यांकडून घ्यावा, या शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले. राष्ट्र महान आहे, राजा महान नाही, हा सिद्धांत सर्वात आधी आर्य चाणक्यानं मांडला.  चाणक्यानं सम्राट घडवण्याचं काम केलं. अशा शब्दांत शाह यांनी आज चाणक्य नीती समजावून सांगितली.

साम, दाम, दंड, भेद ही चाणक्य नीती असली, तरी त्याचा उपयोग राजासाठी नव्हे तर राज्यासाठी व्हा, असंही शाह यांनी म्हटलय. पुण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. राजाच्या इच्छेपेक्षा राष्ट्रसन्मान महत्त्वाचा असतो, हे देखील त्यांनी यावेळी चाणक्याचा संदर्भ देत सांगितलं.