शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का? आपटेवर गंभीर आरोप करत अमोल मिटकरींचा सवाल, म्हणाले...

Amol Mitkari Slam Jaydeep Apte: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2024, 12:46 PM IST
 शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का? आपटेवर गंभीर आरोप करत अमोल मिटकरींचा सवाल, म्हणाले... title=
Amol Mitkari attacks on Jaydeep Apte over Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Malvan

Amol Mitkari Slam Jaydeep Apte: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यात विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर, या घटनेवरुन महायुतीतही ठिणगी पडली असल्याची चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यनंत्री अजित पवार यांनी बुधवारी जनतेची जाहीर माफी मागितली होती. तर, आज पक्षाकडून काळी पट्टी बांधून मुक आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आवटेवर गंभीर आरोप केला आहे. तसंच, त्याच्यावर राष्ट्रदोह

4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतण्याचे अनावरण करण्यात आले होते. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतण्याचे अनावरण झाले. मात्र, 8 महिन्यातच पुतळा कोसळल्याने राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन एस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या दोघही फरार आहेत. मात्र, या सगळ्यात आता आमदार अमोल मिटकरी यांनी आपटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.     

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याला खोप ही जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. शिवाजी महाराजांचे जगभरात जितके पुतळे आहेत कोणत्याही पुतळ्यात डाव्या भुवयाच्यावर खोप दाखवण्यात आलेली नाही. पण हे जाणीवपूर्व चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला. शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्यांवर खोप का दाखवली गेली याचा खुलासा नौदल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी केली आहे. 

मिटकरी पुढे म्हणतात की, जेव्हा आपटेने महाराजांच्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हाच त्याच्या कमेंटमध्ये अनेकांनी कमेंट करत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यावर उत्तर देत म्हटलं की, मला 1659 सालचा इतिहास सगळ्यांसमोर आणायचा होता. आता तो इतिहास म्हणजे. अफजल खानच्या भेटीदरम्यान अफजल खानचे वकील म्हणून कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत होते तर वकिल हल्ला करणार नाही असं ठरल्यानंतरही बालकृष्ण भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांवर वार केले होते. यानंतर शिवाजी महाराजांनीसुद्धा कृष्णा भास्कर कुलकर्णीचे दोन तुकडेही केले होते. असा इतिहास असताना आपटे यांनी जाणीवपूर्वक हे सर्व रंगवलेलं आहे, असा आरोप मिटकरींनी केला आहे. 

 शिवाजी महाराजांच्या डोक्यावरील खूण का जाणीवपूर्वक दाखवण्यात आली याचा खुलासा नौदल , सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सरकारने सुद्धा करावा अशी मागणी ही मिटकरींनी केली आहे.