योगेश खरे, झी मिडिया, नाशिक : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात(Maharashtra Politics).. मात्र, आता शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे. शहाजी बापू पुन्हा गट बदलणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केला आहे. मिटकरी यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे(Latest Political Update).
एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेहमी चर्चेत असणारे आमदार म्हणजे शहाजीबापू पाटील. काय झाडी ,काय डोंगर... या एका डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. यानंतर आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते अमोल मिटकरी यांच्यामुळे
शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. आता थेट शहाजी बापू पाटीलच विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शहाजीबापू पाटील आमच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. मात्र, पक्षांच्या काही सूचना असल्याने मी गौप्यस्फोट करणार नाही असे म्हणत अमोल मिटकरी यांनी स्पष्ट काही न बोलता थेट शिंदे गटाला टार्गेट केले आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या मंथन मेळाव्यात अमोल बोलत होते. काही गोष्टी कळल्या असल्या तरी त्या सांगता येत नाहीत असेही मिटकरी म्हणाले.
येत्या काळात महाराष्ट्रात खूप मोठा बदल होईल. आषाढी एकादशीची पूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील असा विश्वास देखील मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व अजित दादांनी करावं. आषाढीची पूजा अजित दादाच करतील असेही मिटकरी पुढे म्हणाले.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जळगावात बंदी घालण्यात आली आहे. नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यावर देखील मिटकरी यांनी भाष्य केले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर कोणी गदा आणू शकत नाही. कितीही बंदी असली तरी कुणाचा विचार तुम्ही दाबू शकत नाही. कितीही आदळआपट केली तरी कुणाचा आवाज दाबू शकत नाही. गुलाबराव पाटील जास्त घाबरले आहेत असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला.