अमरावतीच्या मुशर्रफची कमाल; संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण

घरात अभ्यास करायला पुरेशी जागा नसतानाही मुशर्रफने परिस्थितीशी जुळवून घेत लक्षणीय यश मिळवले. 

Updated: Jul 31, 2020, 11:57 AM IST
अमरावतीच्या मुशर्रफची कमाल; संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत SSC अमरावती जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी, गणित, हिंदी आदी विषयात विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. पण अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मधील एका मुस्लिम विद्यार्थ्यांने संस्कृतसारख्या कठीण विषयांत मिळवलेले १०० पैकी १०० गुण हे सर्वांसाठी आश्चर्यचा धक्का देणारे ठरले. मुशर्रफने असे नाव असून तो धामनगाव रेल्वे येथे शिवाजी नगर मध्ये राहतो. त्याने संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवण्याबरोबर घरच्या बिकट परिस्थितीला छेद देत त्याने दहावीत ९५% मार्क मिळवून यशाला गवसणी घातली आहे.

घरात अभ्यास करायला पुरेशी जागा नसतानाही मुशर्रफने परिस्थितीशी जुळवून घेत लक्षणीय यश मिळवले. एरवी विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी,गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवतात. पण मुर्शरफ हा हिंदी भाषिक असून सुद्धा त्याने संस्कृत मध्ये मिळवलेले १०० पैकी १०० गुण मात्र हे वाखाखण्याजोगे आहे. सेठ फत्तेलाल लाफचंद सेफला  महाविद्यालयात शिकणाऱ्या मुशर्रफ ने मिळवले ९५% टक्के गुणात त्याच्या आई वडिलांचा वाटा आहे. आम्ही एक वेळला उपाशी राहू पण आमच्या मुलाच्या शिक्षणाला काहीच कमी पडू देणार नाही असा त्याची आई सांगते.

मुशर्रफची परिस्थिती बिकट आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्याचे वडील इलेक्ट्रॉनिक चे कामे करतात. आई घरी दोन चार कोंबड्या घेऊन कुक्कुटपालन करते. अशा परिस्थितीत त्यांनी मुलाला शिकवले आहे. माझी परिस्थिती नसल्याने मी शिकू शकलो नाही पण आता मला माझ्या मुलाला आणखी खूप शिकवून त्याला देशसेवा करायला लावायचा मानस त्याच्या वडिलांचा आहे.