अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर नवनीत राणा संतापल्या; राज्यपालांना लिहिले पत्र

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अनागोंदी कारभारामुळे आतापर्यंत चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहेत. 

Updated: Oct 23, 2020, 03:53 PM IST
अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर नवनीत राणा संतापल्या; राज्यपालांना लिहिले पत्र title=

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अनागोंदी कारभारामुळे आतापर्यंत चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहेत. आता परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता परीक्षा नेमकी होणार तरी कधी, असा संतप्त सवाल विद्यार्थी करत असताना आता या प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. त्यांनी याविषयी राज्यपालांना पत्र लिहून परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

ही कंपनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून काही विद्यार्थी आम्हाला फोन करून परीक्षा न झाल्यास आम्ही आत्महत्या करू, असे सांगत आहे. अमरावती विद्यापीठाच्या सततच्या भोंगळ कारभारात विरोधात विद्यार्थी संतप्त असतानाच आता विद्यापीठाच्या या कारभाराविरोधात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या संदर्भातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहले आहे. 

अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उन्हाळी परीक्षा मागील सहा महिन्यापासून कोरोनामुळे रखडत आहे. आतापर्यंत तबल चार वेळा परीक्षा या रद्द झाल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यां विद्यापीठाच्या या कारभाराचा नाहक त्रास करावा लागत आहे. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.