Mumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...

Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे. 

Updated: Jan 20, 2023, 08:22 PM IST
Mumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...  title=

Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे. परंतु हे दुकान त्यांनी फोडलं तरी कसे याचा सुगावा पोलिसांना (Dombivali Crime News) पाहा कश्या पद्धतीनं लागला आहे. चोर दरारा दाखवून नाहीतर सरळ दुकानात शिरून दमदाटी करत किंवा धाक दाखवत चोरी करताना दिसतात परंतु यावेळी त्यांनी चक्क भिंतीचे भगदाड फोडून मध्यरात्री चोरी केल्याची घटना समोर येते आहे. (an attempted theft occured goldsmith's shop in Dombivli)

सलग दुसऱ्या दिवशी डोंबिवलीत सोनाराच्या दुकानात भगदाड पाडत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानालगत असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंतींना भगदाड पाडत या दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड (Mumbai Crime) पाडण्यात त्यांना अपयश आले व त्या दोन्ही चोरट्याने तेथून काढता पाय घेतला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी सोन्याचा दुकानांना लक्ष केल्याने डोंबिवलीतील ज्वेलर्स मध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. 

डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात काल दोन ज्वेलर्सच्या (Jewellary) दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने चांदी असे मिळून तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. ही घटना ताजी असताना आज पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत देखील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.डोंबिवली पूर्वेत श्रीखंडेवाडी परिसरातील राजलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंती फोडून त्यांनी या ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रयत्न यशस्वी ठरल्याने दोन्ही चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. दरम्यान हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेरात कैद झालेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चोट्यांचा शोध सुरू केला आहे.  

हेही वाचा - Pathaan Movie: Controversy मध्ये अडकल्यानंतरही Pathaan चित्रपटला प्रेक्षकांची साथ...

यापुर्वीही अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. सध्या डोंबिवलीत गुन्हेगारीही वाढताना दिसते आहे. सध्या अशाप्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता सोन्याच्या दुकाना चोऱ्या होत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.