झोका खेळताना गळ्याला दोर अडकून १३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

जळगावमधील धक्कादायक घटना...

Updated: Feb 2, 2020, 04:32 PM IST
झोका खेळताना गळ्याला दोर अडकून १३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू title=

जळगाव : झोका खेळता खेळता झोक्याचा दोर गळ्यात अडकला गेल्याने फास लागून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शिरसोली इथे ही घटना घडली. राधा लक्ष्मण भिल असं या मुलीचं नाव आहे. राहत्या घरी राधा झोका खेळत होती. अचानक तिच्या गळ्याभोवती दोर आवळला गेल्याने फास लागला. त्यात ती बेशुध्द होऊन खाली पडली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने कुटुंबीयांसह ग्रामस्थही हादरून गेले आहेत.