आनंदवारी धर्मवारी नाही तर मानवतेची वारी

साडेतीन दशकाहून अधिक काळ सुरु असलेली ही परंपरा आजही कायम आहे. 

Updated: Jun 17, 2017, 11:27 PM IST
आनंदवारी धर्मवारी नाही तर मानवतेची वारी title=

आळंदी : आनंदवारीत ही केवळ एका धर्माची वारी नसून ती मानवतेची वारी आहे याची खात्री पटते, ती अनगड वाली शहा दर्ग्यात.साडेतीन दशकाहून अधिक काळ सुरु असलेली ही परंपरा आजही कायम आहे. 

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानांनंतर अनगड वालिशा दर्ग्यातील विसावा आणि तिथं होत असलेली आरती पाहण्यासाठी वारकरी आवर्जून उपस्थित असतात. 

अनगड वालीशा हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगतगुरू तुकाराम महाराजांची विठ्ठल माउली प्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा या मूळ या मुस्लीम संतान जगद्गुरू तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे.

तुकाराम महाराज आणि अनगड वालीशा या दोन संतांच्या भेटीच प्रतिक म्हणून आजही याकडे पाहिलं जातं.