लाडकी बहिण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय. वर्षाकाठी तब्बल 50 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे आता इतर योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे कोणत्या कोणत्या योजनांवर गंडांतर येणार आहे जाणून घ्या.
'लाडकी'साठी इतर योजनांवर गंडांतर?
आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी बंद होणार?
आर्थिक शिस्त लावण्यासाठी योजनांना कात्री?
विधानसभा निवडणुकी पूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा फायदा महायुतीला झाला. लाडक्या बहिणींमुळे महायुतील सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलं. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नसून त्यात वाढ करण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. सध्या कोट्यवधी लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी सरकार महिन्याला 4 हजार कोटी खर्च करतंय. लाडक्या बहिण योजनेचा तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी आता सरकार इतर योजनांना कात्री लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आनंदाची शिधा आणि शिवभोजन थाळी योजना सरकार बंद करणार असल्याची माहिती मिळतेय.
राज्यातील गरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी 100 रुपया आनंदाची शिधा देण्यात येतोय. मात्र आता सरकार आनंदाची शिधा योजना बंद करणार असल्याची माहिती आहे. तसं झाल्यास राज्यातील लाखो गरीब कुटुंबाची दिवाळी गोड कशी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय.
आनंदाची शिधा योजना सरकारनं राज्यातील गरीब कुटुंबासाठी सुरू केलीय. या योजनेतून गरीब लोकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येते. त्यात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल देण्यात येतंय. राज्यातील गरीब आणि कष्टकरी लोकांना पोटभर आणि चांगलं जेवण मिळावं यासाठी 2020 साली सरकारनं शिवभोजन थाळी सुरू केलीय. 10 रुपयात गरिबांना पोटभर जेवण मिळावं यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली.
2 चपात्या
1 वाटी भाजी
1 वाटी भात
1 वाटी वरण
लाडक्या बहिण योजनेसाठी वर्षा काठी राज्य सरकारवर जवळपास 50 हजार कोटींचा बोजा येणार आहे. त्यामुळे इतर योजनांवर कात्री लावण्यात येणार आहे. धनंजय मुंडेंकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील काही योजनांना कात्री लावण्यात येणार आहे.
गरिबांना 10 रुपयात शिवभोजन थाळी मिळतेय. मात्र लाडक्या बहिण योजनमुळे तिजोरीवर भार येतोय. त्यामुळे सर्वसामान्यांना 10 रुपयात पोटभर जेवण मिळण्याची शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 242/2
|
VS |
DC
195/9(20 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Delhi Capitals by 47 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 128/8
|
VS |
NEP
129/2(15.5 ov)
|
| Nepal beat United Arab Emirates by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 199/5
|
VS |
GT
100(15.5 ov)
|
| Mumbai Indians beat Gujarat Titans by 99 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.