तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल

वाखरीमध्ये थोड्याच वेळात पार पडतोय रिंगण सोहळा

Updated: Jul 21, 2018, 05:50 PM IST
तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल  title=

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. अवघी पंढरी दुमदुमून गेलीय. या दिवसांत पंढरपूरचं रुपडं काही औरचं असतं. 

पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी भाविक आता आतूर झालेत. पंढरी जवळ आलीय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या पालख्या एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे वाखरी... त्यामुळे या क्षेत्राला संतनगर म्हणूनही संबोधले जाते. येथून पंढरीपर्यंतचा प्रवास म्हणजे विठू माझा लेकुरवाळा, संगे संतांचा मेळो याची प्रचिती निर्माण करतो... वाखरीमध्ये रिंगण सोहळ्याचा एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो.

कृषी प्रदर्शनाचं आयोजन 

वारकऱ्यांमधे शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.. पंढरीच्या वारीतून विठ्ठलाच्या आशिर्वादा सोबतच कृषी क्षेत्रातील नवनवीन माहिती शेतकऱ्यांना व्हावी. यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शुअर शॉट यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय..  यानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३०० विविध कृषी विषयक दालन या ठिकाणी असणार आहेत. तीन लाख शेतकरी इथे भेट देतील अशी अपेक्षा संयोजकाना आहे.