Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा

Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते. 

Updated: Dec 5, 2022, 10:23 AM IST
Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा title=
Anganewadi Jatra 2023 dates announced

Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते. ग्रामदेवता, कुळदेवता आणि पंचक्रोशीतला देव अशा देवदेवतांच्या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच कुतूहलाचा विषय राहिलेला नसून, अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा विषय झाला आहे. अशाच महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही कोकणवासियांच्या (Konkan) श्रद्धास्थानी असणाऱ्या श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख जाहीर झाली आहे. (Anganewadi Jatra 2023 dates announced)

हेसुद्धा वाचा : Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील आंगणेवाडी भराडी देवीची यंदाची यात्रा 4 फेब्रुवारीला पार पडणार आहे. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आणि या यात्रेला येत असतात. भाविकांबरोबरच राज्यभरातील नेतेमंडळींचीही मोठी गर्दी या यात्रेला दिसते. यंदाच्या वर्षी 10 लाखांच्या आसपास भाविक यात्रेला येतील असा अंदाज मंदीराच्या कार्यकारिणीकडून वर्तवला जात आहे.

कोकणवासियांनो यात्रेचा जाण्यासाठी तयारी सुरु करा 

देवीच्या यात्रेची तारीख कळल्यामुळं आता अनेक चाकरमान्यांनी गावाला जाण्यासाठीचे बेत आखण्यास सुरुवात केली असणार यात शंका नाही. नोकरीच्या ठिकाणी सुट्ट्यांची जुळवाजुळव करण्यापासून ते अगदी गावाला जाण्यासाठी एसटी, रेल्वे मार्गावर तिकिटं मिळवण्यापर्यंतची अनेकांचीच धडपड एव्हाना सुरु झालीये. तुम्ही कधी जाण्याचा बेत आखताय? (ST, Railway Reservations)