महिला पोलिसाचा नंबर मागणाऱ्याला संतप्त जमावाचा चोप; बचावासाठी पुन्हा पोलिसांकडेच धाव

  महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणे तरुणाला महागात पडले आहे. संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला

Updated: Mar 18, 2022, 11:25 AM IST
महिला पोलिसाचा नंबर मागणाऱ्याला संतप्त जमावाचा चोप; बचावासाठी पुन्हा पोलिसांकडेच धाव title=

वाल्मिक जोशी, जळगाव : शहरात महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणे तरुणाला महागात पडले आहे. महिला पोलिसांना दमदाटी आणि अरेरावी करणाऱ्या रोड रोमिओ तरुणाला इतरांनी हटकले. तरुणाचा बेशिस्तपणा पाहून संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ परिसरात व्हायरल होत होता.

महिला पोलीस कर्मचाऱ्याशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्या बेशिस्त तरुणाला संतप्त जमावाने नेरी नाका परिसरात जोरदार चोप दिला. त्यावेळी जमाव इतका आक्रमक झाला की, त्या तरुणाला आपल्या बचावासाठी पुन्हा पोलिसांचाच आधार घ्यावा लागला. 

संबधीत तरुण महिला पोलिसाला मोबाईल नंबर मागून विनाकारण हुज्जत घालत होता. हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिला पोलिसाचा फोटो देखील आपल्या मोबाईलमध्ये काढला. 

वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलिसाची छेड काढल्याने तेथे जमाव झाला. संतप्त जमावाने तरुणाला दमदार चोप दिला. त्याने रिक्षात बसून पळण्याचा प्रयत्न केला परंतू, त्याला जमावाने रिक्षातून बाहेर काढूनही आणखी फटके दिले.

घटनास्थळी जमलेली गर्दी पाहता तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनीच त्या तरुणाला तेथून शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये नेले. तेथे या तरुणावर गु्न्हा दाखल करण्यात आला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x