सांगली: चिमूकलीच्या प्रश्नाने पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ

प्रांजल... वय वर्ष तीन... मात्र तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शरमेनं मान खाली घालावी लागली. इतकेच नव्हे तर, पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली असतानाच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणाऱ्या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय..

Updated: Nov 12, 2017, 05:36 PM IST
सांगली: चिमूकलीच्या प्रश्नाने पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : प्रांजल... वय वर्ष तीन... मात्र तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शरमेनं मान खाली घालावी लागली. इतकेच नव्हे तर, पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली असतानाच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणाऱ्या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय..

मम्मी पप्पाला मारुन आले का...?

मम्मी पप्पाला मारुन आले का.... या गर्दीतून येणारा हा चिमुकलीच्या या आर्त आवाजातील सवालापुढे पोलिसांकडे उत्तर नव्हते. कुणाचंही काळीज हेलावून टाकेल असा हा आर्त सवाल आहे सांगलीतील मृत अनिकेत कोथळे याच्या तीन वर्षाच्या लेकीचा.. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमूखी पडलेल्या अनिकेथ कोथळे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांत्वन केले. या भेटीवेळी अनिकेतच्या कुटूंबियांनी विशेषत: त्यांच्या चिमूकलीने विचारलेल्या प्रश्नांमुळे पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली. तर, उपस्थितांचेही डोळे पाणावले.

मारेकऱ्यांना द्या फाशीची शिक्षा

दरम्यान, सांत्वनासाठी गेलेल्या पोलिसांकडे  अनिकेतच्या आईनं नराधम मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.  मारेकऱ्यांना शिक्षा मिळेलही पण चिमुकलीनं गमावलेल्या पितृछत्राचं काय़ अशी चर्चा सांगलीत रंगलीय.