'दहा खडसे-भुजबळ आले तरी पुरून उरू'

दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाटेत आले तरी त्यांना पुरुन उरू

Updated: Jun 20, 2018, 09:25 PM IST

जळगाव : दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाटेत आले तरी त्यांना पुरुन उरू असं आव्हान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना दिलंय. दमानिया यांना पोलीस अटक का करीत नाहीत असं आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिलं होतं. त्यानंतर दमानिया स्वतःहून जळगाव पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर झाल्या. त्यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन खडसेंनी दिलेली फिर्याद कशी निराधार आहे याबाबत चर्चा केली. आपला लढा संपणार नसून हिंमत असेल तर हायकोर्टात येऊन लढा असं खुलं आव्हान दमानियांनी खडसेंना दिलंय.