उल्हासनगर : नागपूरच्या अंकिता कनौजिया नावाच्या युवतीचा तिच्याच मित्रांनी अत्याचार करुन खून केला होता.. यानंतर आरोपींनी अंकिताचा मृतदेह बेळगावला नेऊन टाकला आणि पोलिसांपुढे शरणागती पत्कारली.. या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीये..
शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या तपासात हा सगळा बनाव असल्याचं निष्पन्न झालंय. निलेश खोब्रागडे हा अत्याचार आणि हत्येत सहभागी नसला, तरी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या कटात तो सहभागी होता. त्यामुळं पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
या तिघांनाही काल उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस सध्या पुढील तपास करतायत.