आरारारा खतरनाक... VIDEO पाहून तुम्ही म्हणाल हत्येचा हा तर 'मुळशी पॅटर्न'

नागपूरमध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाच्या कथनकाप्रमाणे, वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी, गुन्हेगारी टोळीत राहून कुख्यात गुंड

Updated: Sep 28, 2020, 08:03 PM IST
आरारारा खतरनाक... VIDEO पाहून तुम्ही म्हणाल हत्येचा हा तर  'मुळशी पॅटर्न' title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर  :  नागपूरमध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाच्या कथनकाप्रमाणे, वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी, गुन्हेगारी टोळीत राहून कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची हत्या करण्यात आली आहे. ही एक प्राथमिक माहिती असली, तरी मुळशी पॅटर्न सिनेमातील दृश्य सर्वांच्या डोळ्यासमोर येईल असंच काहीसं नागपुरात घडतंय...

वडिलांचा १९ वर्षाआधी झालेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी मुलाने कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची हत्या केल्याची समोर आलं आहे. शनिवारी भररस्त्यावर बिनेकरचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्याचं सीसीटीव्ही व्हायरल झालं होतं. त्यानंतर शहरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी चेतन हजारेसह चार जणांना जेरबंद केलंय. एक आरोपी सध्या फरार आहे.

नागपुरातील गुंड बाल्या बिनेकरची शनिवारी निघृ्ण हत्या करण्यात आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. बाल्यावर  अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, तो जुगार अड्डा चालवयचा. 

गुन्हेगारी जगतात दबदबा  असणा-या बिनेकरच्या हत्येमुळं एकच खळबळ उडाली आहे.  19 वर्षांनंतर वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी बाल्या बिनेकरचा खात्मा चेतन हजारेनं आपल्या सहका-यांसोबत केल्याची माहिती समोर आलीय. 

चेतन हजारेचे वडील सुनिल हजारे यांची बाल्या बिनेकरनं हत्या केली होती. त्यावेळी चेतन अल्पवयीनं होता. मात्र वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी विश्वात आलेला चेतन हजारे संधीच्या शोधात होता. अखेर शनिवारी चेतनं व त्याचा चार साथीदारांनी भर चौकात दिवसाढवळ्या बोले पेट्रोलपंप चौकाजवळ बाल्या बिनेकरचा गेम केला.

या हत्येनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली.त्यानंतर गुन्हे शाखाने चेतन हजारे,रजत तांबे, भरत पंडित आणि आसिम लुडेकर या चौघांना अटक केलीय. वडिलांच्या खूनाचा बदला घेत  चेतननं बिनेकरची हत्या केल्याच समोर आलंय.मात्र बिनेकरची नागपुरच्या गुन्हेगारी जगतातविश्वात वाढत असलेला दबदब्यातून चेतनच्या माध्यमातून काटा काढली असण्याचीही चर्चा आहे.

बिनेकरच्या अत्ययात्रेलाही हजारोंची गर्दी झाली होती. सोशल डिस्टिंग्सिंचा फज्जा उडाला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र या हत्याकांडामुळं गुन्हेगारांना पोलिसांची कोणतीच धास्ती नागपुरात राहिली नसल्याचं चित्र समोर येतंय.