close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सांगलीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, १८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी

 सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज 

Updated: May 22, 2019, 08:35 PM IST
सांगलीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, १८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. 140 टेबल आणि 18 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून सुरवातीला टपाली आणि त्यांनतर लगेचच ईव्हीएम मतमोजणीला होणार सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 20 टेबल आणि टपाली आणि सैनिकी असे एकूण 140 टेबलावर मतमोजणी केली जाणार आहे. 18 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 592 अधिकारी- कर्मचारी तर 500 पोलीस अधिकारी- कर्मचारी बंदोस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. 

सांगली लोकसभेसाठी 65.36 टक्के मतदान झाले, यात 11, लाख 78 हजार 814 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि वंचीत बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाली, उद्या 23 मे ला मतमोजणी आहे.

23 मेला सकाळी 7 वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. टपाली मतमोजणी ठीक 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू केली जाईल. तसेच, ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय यादृच्छिकरीत्या निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) 5 व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात सैनिक मतपत्रिका 3 हजार 870 आणि टपाली मतपत्रिका 9 हजार 208 असे एकूण टपाली मतदान 13 हजार 78 आहे. 23 मे रोजी सकाळी 7.59 मिनिटांपर्यंत आलेल्या टपाली मतपत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. इटीपीबीएस (सैनिक मतपत्रिका) स्कॅनिंग 14- सी या गोदामात करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली आहे. तर 60 मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक राजपत्रित अधिकारी व एका संगणक चालकाची नियुक्ती आणि अशा प्रत्येक 10 टेबलसाठी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.